Today’s Bible Readings

आजची बायबल वाचने

Monday, 2 November 2026

Liturgical Season: Ordinary Time

Read and reflect on the Word of God.
देवाच्या वचनाचे वाचन आणि मनन करूया.

First Reading | पहिले वाचन

Wisdom 3:1-9

या वाचनाचा मराठी मजकूर सध्या उपलब्ध नाही.

Responsorial Psalm | प्रतिसादात्मक स्तोत्र

Psalm 23:1-3a, 3b-4, 5, 6

याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही.

ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्‍या झर्‍याजवळ नेतात.

ते माझा जीव ताजातवाना करतात. ते आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितात.

मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात.

तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे.

खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती मजबरोबर आयुष्यभर असतील, आणि मी याहवेहच्या, घरात सदासर्वदा राहीन.

Second Reading | दुसरे वाचन

Romans 5:5-11

आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.

आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले.

नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल.

परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.

त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल!

आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!

एवढेच नव्हे, तर परमेश्वरामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अभिमान बाळगतो, त्यांच्याद्वारे आमचा आता समेट झाला आहे. आदामाच्या द्वारे मृत्यू, ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन

Gospel | शुभवर्तमान

John 6:37-40

जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही.

कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे.

आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे.

कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”

Marathi: Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण (Bible) of India copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Contributor: Biblica, Inc. This work is made available under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License (CC BY-SA)